ध्येयसाध्य - ध्येयाचे २१ स्तंभ
"जर तुम्हाला सुखी आयुष्य जगायचे असेल, तर आयुष्याचा संबंध कोणत्याही व्यक्ती किंवा वस्तूशी जोडण्याऐवजी एका ध्येयाशी जोडा." - अल्बर्ट आइन्सटाइन
आयुष्यात जगण्यासाठी काहीतरी असणे म्हणजेच मनुष्य असल्याचे सर्वोत्तम लक्षण आहे असे म्हणता येईल. आणि हीच गोष्ट आपल्याला पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांपासून वेगळी करते. सर्व 'विचारी' मनुष्यांच्या काही विशिष्ट इच्छा असतात. जसे की, आर्थिक, सामाजिक, आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत, काही स्वतःच्या तर काही देशासाठीच्या… काही इच्छा पूर्ण करण्याकरिता प्रयत्न केले जातात आणि सहसा त्यातील खूप कमी इच्छा पूर्ण होतात. परंतु, बहुसंख्य लोकांकरिता बराचशा इच्छा ह्या केवळ इच्छाच राहतात ज्या पुर्णत्वापासून खूप दूर असतात.
याचे एक प्रमुख कारण म्हणजे स्वतःबद्दलच्या कटिबध्दतेची असलेली कमतरता. यावरच्या उपायांची सुरुवात होते, एक चांगले आणि मजबूत ध्येय ठरवण्यापासून. आणि यानंतर एक महत्वाची प्रक्रिया सुरु होते ती म्हणजे स्वतःला ध्येयासाठी सज्ज करणे आणि त्याप्रती कटिबद्ध राहणे. 'ध्येयसाध्य' याच प्रक्रियेवर ध्यान केंद्रित करते. लक्षात घ्या की, एखाद्या व्यक्तीचे ध्येय त्या व्यक्तीसाठी पात्र असण्याआधी ती व्यक्ती त्या ध्येयाच्या लायक बनणे आवश्यक आहे. ‘ध्येयसाध्य - ध्येयाचे २१ स्तंभ' हे एखाद्याला ध्येयासाठी 'लायक' बनवण्यात मदत करते.

